श्री पांडुरंग स्तोत्र Shri Pandurang Stotra Sri Pandurang Stotram

।। श्री पांडुरंग स्तोत्र ।।
 

।। श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै.नमः । श्री पांडुरंगाय नमः ।।

 
ॐ नमोजी उदारा । ॐ नमोजी मयुरेश्वरा । महामंगला अघमलहरा । सर्वांगसुंदरा गणपती । अंगी सिंदुराचे भूषण । भाली शोभो मृगलांछन । दोंदिलतनच गजवदन । दुर्वा़कुर मस्तकी ।
 
तु ऋदिसिद्धिचा नायक । मंगलदाता विनायक । तु अर्पेणेचा बालक । मंगल माझे करावे । हे सर्वांग सुंदरे सरस्वती । तु श्वतवसना आद्य ज्योती । मम जिव्हाग्री करुन वसती । स्तोत्र वदवी अमोघ ।
 
तुझ्या कृपेचा महिमान । आगळे आहे सर्वाहुन । मुकाही वदे वेदांत ग्रहण । पंगु लंघी पर्वता ।।
 
ऐशी तुझी गाजते कीर्ती । प्रचिती दावी.मजप्रती ।
 
हे कविजनांचे ध्येयमुर्ती । अंत माझा पाहु नको ।।
 
 
आता वंदन सद्गगुरुराया । श्रीरामदास सदया ।
 
लेकरावरी करून दया । कोडकौतुक पुरवा हे ।।
 
 
आता वंदु सिद्ध महंत । जे क्षमा शांतिचे कोश सत्य ।
 
जे कबीर अवतार साक्षात । साईबाबा शिर्डिचे ।।
 
 
ज्यांचे घेता दर्शन। पापा ताप पळेल दैन्य ।
 
ते नरदेहधारी भगवान । पगवतो मशी.सर्वदा ।
 
आता वंदु सज्जना तैसच । श्री गुरू वामना ।
 
मातापितरा विद्वज्जना । तैसच.अवघ्या भाविकांसी ।।
 
 
हे चंद्रभातटविहारा । हे सच्चिदानंदा सर्वेश्वरा ।
 
हे चराचरव्यापका उदारा । सर्वाद्या विश्वपती । ।
 
 
हे केशवा .केशीमर्दना। हे माधवा.मधुसुदना।
 
हे भक्तमानसरंजना । पांडुरंगा रुक्मिणीपती ।।
 
 
तु मत्स्य कच्छ वराह नरहरी । वामन परशुराम अवतारी
 
कृष्ण बैद्ध कलंकी या परी । नाना रूप धरीलीस
 
जैसे जैसे भेटती भक्त । तैसा तु नटसी अनंत ।
 
वेदाही श लागला अंत । तुझा बापा.नारायणा।।
 
 
मत्स्य होऊन शंखासुरा । त्वा मर्दिले रमावरा ।
 
दंतावरी धरिली धरा । वराह अवतारी पांडुरंगे ।।
 
निजभक्तरक्षण्यासाठी। स्तंभी प्रगटाला जगजेठी ।।
 
 
हिरण्यकश्यपु उठाउठी । वधिला उदर विदारून ।
 
वामन होऊन बळीस । त्वा घातिले पाताळासी ।।
 
 
अभिमान होता क्षत्रयिसी । निवटिला भार्गव रुपे तो
 
दशीग्रीव लंकानाथ । कुंभकर्णादि इंद्रजीत ।
 
दवरथाचा होवुन सुत । सुवेळाचली मर्दियेले ।।
 
 
कंस शिशुपाल वक्रदंता । त्वा वधिले कृष्णनाथा।
 
बौध्द होवुनिया आता । बसलास येथे भिमातटी ।
 
करावया पतितोध्दार । हा त्वदीय अवतार साचार ।
 
पुंडलिके विटेवर । उभे केले तुज लागी ।।
 
 
जगदारंभापासुन । भक्त तुझे गाती गुण ।
 
तू भक्तवत्सल परिपूर्ण । ब्रीद गाजते पांडुऱगा ।
 
प्रल्हाद कयाधुसुता । पर्वातावरुन लोटिता ।
 
त्या ठायी संयरक्षिता । तुच झालासि दीनबंधु ।।
 
 
सुधन्वा भक्त निर्वाण । तप्त तैली टाकता जाण ।
 
केलेस त्याचे संरक्षण । महिमा वानु कोठवरी ।।
 
 
शबरी भक्तणी प्रेमळ । तिने उष्टे बदरीफळ ।
 
अर्पण केले सोज्जवळ । भाव चित्ती धरोनी ।
 
त्या बदरफळाप्रती । त्वा सेविले रमापती ।।
 
 
रामायणी त्वदीय कीर्ती । ही गायली वाल्मिके । ।
 
 
जटायुनळनीळअंगदा । त्वा.तारिले गोविंदा ।
 
महाबळीस आनंद कंदा । केलेस की रे चिरायु । ।
 
 
निजनाम महिमा अद्भुत ।दाविला तु जगतात ।
 
शिळारामनामांकीत । तरत्यख झाल्या सागरी ।
 
लंका घेतली वानरा हाती । ऐसा तु प्रतापज्योती ।।
 
 
हे रामचंद्रा रघुपती । माझी उपेक्षा करू नको ।
 
नंदगृही नंदनंदना । अगम्य लीला.नारायणा ।
 
केल्यास गोकुळवृंदावना । गोपगोपी उद्धराया ।।
 
 
श्री यशोदा नंदराणी । करीता संकष्टीव्रत जाणी ।
 
तुच गणानाथा होवुन । मोदक अवघे भक्षिले ।।
 
 
जननीचा मोह हरावया । मुख पसरून देवराय ।
 
विश्वरुप दाविले ते ठाया । यशोदेसी विठ्ठले ।।
 
 
कालिया मर्दियला यमुना तिरी । करनखाग्री धरली गिरी
 
पेंद्याची बुरशी भाकर । परमादरे सेविलीस ।।
 
 
धेनुवत्स गोपगण । हरण करीता चतुरानन ।
 
दुसरे तैसेच निर्माण । केले आपल्या मायेने ।।
 
 
हमामा घालुध हुंबरी । रंजविल्या व्रजसुंदरी ।
 
कु़जवनाभितरी । षण्मासीची करुनी निशा ।।
 
 
भीमार्जुन युधिष्टिर । जे पंडुराजाचे कचमार ।
 
त्यांचे साह्य निरंतर । केलेस की कमलनाभा ।।
 
 
द्रौपदी पांडवांची कांता। भीष्मशिबिराप्रती जाता ।
 
पादरक्षा घेवुन अनंता । गडी तियेचा झालासी ।।
 
 
सांडुन पंचपक्वान । विदुराचे सेविलेत्रकदान्न
 
तु भक्तवत्सल दयाघन ।श्रीमुरारी पुरुषोत्तमा।।
 
ध्रव स्थापिला अढळपदा । तु परम उदार गोविंदा ।।
 
 
भक्तांच्या वारीस आपदा। दर्शनभावे श्रीहरी.।।
 
 
खजामीळ पापराशी । त्वा उध्दरिल्या ऋषिकेशी ।
 
सुवर्णपुरी सुदाम्यासी । दिधलीस नारायणा ।।
 
 
अपरोक्षज्ञानभांडार । उद्ववादिधले साचार ।
 
मुळ येता अक्रुर । मथुरे गेलास अधोक्षजा ।।
 
 
नाना मते नाना पंथ । जरी जगती अस्तित्वात ।
 
परी अवघ्यांचे.सार सत्य । एक तुच अससी की ।
 
निजभक्तांच्या संसरक्षणा । नाना रूपे कमल वदना ।
 
धारण.करुन मनकामना । पूर्ण.केल्यास तयांच्या ।।
 
 
ज्यांना संमत शैव मत । ते तूज म्हणती.उमनाथ ।
 
वैष्णव वदती लक्ष्मीकांत । यवन इलाही बोलती ।
 
चष्मे जरी भिन्न भिन्न । परी प्रकाशी न फरक जाण ।।
 
 
तैसा तु रुक्मिणीरमण । वंद सेव्य सकलासी ।
 
क्षेत्रे अपार भूमिवरी । परी अघ्या ठिकाणी तु हरी ।
 
विश्वनाथ होवुन । काशीपुरी पूजा घेसी भक्तांच्या।।
 
 
तूच ॐकार केदार । सोमनाथ सर्वेश्वर ।
 
त्र्यंबकराज कर्पूरगौर । घृष्णेश्वर तुच पै।।
 
 
महंकाल कालातीत । तू.मलिल्कार्जून.नागनाथ ।
 
वैद्यानाथ गिरीजाकांत । गोकर्ण रामेश्वर तुच पै ।।
 
 
अमृतवाहिनीचे तीर ।तु मोहीनिराज निर्धारी । ।
 
 
ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी । निजकृपये पूर्ण केलीस ‌।
 
अयोध्या गोकुळ वृंदावनी ।तुच अससी चक्रपाणी ।
 
आलास देवा द्वारकूहुनी । डाकुरी भक्ताकारणे ।।
 
 
भिलवडी करवीर ओंदुबर । माहुर वाडी गाणगापुर ।
 
येथे अत्रीचा होऊन कुमर । निजभक्तांना भेटसी ।।
 
 
मैलार मालेगाव जेजुरी । माया कांची व्यंकटगिरी ।
 
ऐशा क्षेत्रा तूच हरी । वससी अनंत रुपानी ।।
 
 
आब्रम्हस्तंभापर्यंत । तूच एक रुक्मिणीकांत ।
 
तुच सगुणगुणातीत । मायाबापा विठ्ठला ।।
 
 
घटटाच्या ठिकाणी । तुझे अस्तित्व चक्रपाणी ।
 
तूच अनंत होऊनी ।जग आणीले आकार ।।
 
 
जडमूढ जीवा कारण । तू देवा झालीस सगणु ।
 
अनंत लीला दावुन । निजभक्तीसी लाविसी ।।
 
 
ते हे रुपडे मनोहर । गळाघवघवीत तुळसीहार ।
 
सर्वांगश्यामसुंदर । कटी कर धरियेले ।।
 
 
पायतळा शोभते विट । वरी आपण उभा नीट ।
 
बहु आतुरते पाहे वाट । आपुल्या भक्तवरांची ।।
 
 
कासे पीत पितांबर । मस्तकी शोभे मुगुठ थोर ।
 
दृष्टी गोजिरी निसाग्र । भाली कस्तुरे विराजिते । ।
 
 
पुष्पहार नाना जाती । आपाद देवा तुझ्या.रुळती ।
 
सन्मुख उभा मारुती । कर संपुटे जोडुन ।।
 
 
पुंडलिके उपकार केला । म्हणुन तुझा लाभ झाला ।
 
त्या पंढरी क्षेत्रा भला । पांडुरंगे विठ्ठाबाई ।
 
जयदेवाचियासाठी । वृंदावनी तू जगजेठी ।
 
प्रगटोनिया उठा उठी । तदीय कांता जिवविली ।।
 
 
कबिराचा वेणुन शेला । त्वा बाजारी वोपिला
 
दर्शन तुलसीदासल । दिधले र मरूपानज ।।
 
जनाबाईचे दळण दळिले ।नामदेवगृह शाकारिले ।।’
 
 
पंतदामाजीस्तव भले । धरिले रुप महाराचे ।।
 
निवृत्ती ज्ञानेश सोपान । तुझे भक्त निर्वाण ।
 
तूच एख पतितपावन । जगत्त्रयी विठ्ला ।।
 
 
मिराबाईस देता विष । ते तु सेविलेस श्रीनिवास ।
 
साह्य केलेस विशेष । भक्त चोख्याचे नारायणा ।
 
जुनागडीचा नरसी मेहेता । नागर ब्राम्हण तत्वता ।।
 
 
त्याचा मुलीसआहेर नेता ।तुच झाला पांडुरंगा ।।
 
पिपाजी नानक सुरदास तुझ आवडती विशेष ।।
 
सजीव केले.कमालास ।.आपूल्या कृपाप्रसादे ।।
 
 
तेरढोकीचा कुंभार । भक्तगोरोबा महाथोर ।
 
त्या कीर्तने.फुटती कर । थोटेपण हरपले । ।
 
 
न.कळता मांजरिची । पिले आव्यात जळाली.साची ।
 
तयी राखा कुंभाराची । बाणी राखीली दिनबंधो ।
 
बैसोनिया माळ्यावरी । पाखरे राखिले.श्रीहरी ।
 
 
अरण्यग्रामाभितरी । भक्त सावत्या कारणे ।
 
गुरुडावरी बैसुन । लहुळी केलेस प्रयाण ।
 
ज्ञान कथोन समाधान । केलेस कुर्मदासाचे ।।
 
 
तुकाबाचे अभंगासी । रक्षिले.इ़द्रायणीसी ।
 
साधू शेख महंमदास । श्रीपुरी तु.भेटलास ।।
 
 
कान्होपात्रा भजन करीता । त्वा उद्धरियले अनंता ।
 
धामणगावचे बोधल्या करीता । अनंत लीला केल्यास ।।
 
 
भक्त संतोबा पवार । यात्रेस येता साचार ।
 
चंद्रभागेस आला पुर । तयी मगर झालासी ।।
 
 
ऐशा.अनंत भक्तांप्रती । त्वा तारिले श्रीपती ।
 
तुज वानिता.निश्चति । वेद चार ही भागले ।
 
पार तुझ्या स्वरुपाचा । कोणाही न लागला साचा ।
 
मग तेथे.दासगणुचा। पाड काय अधोक्षजा ।।
 
 
हे कमलनाभा । हे कमलाकांता मनमोहना ।
 
कालिया कालमर्दना । कारुण्यसिंधु केशवा ।।
 
 
गोपिप्रिय गोपरंजना । गोकुलवासी दयाघना ।
 
गोवर्धनोद्धारणा । गोरक्षका गोविंदा ।।
 
 
हे शेषशयना श्रीधरा । सर्वसाक्षीसर्वेश्वरा ।
 
सर्वाद्या श्यामसुंदरा । क्षीराब्धीवासा जगत्पती ।।
 
 
हे.पंढरीषा पांडुरंगा । पापमोचना प्रपतुंगा ।
 
पांडप्रिया श्रीरंगा । पाठ माझी.राखणे ।।
 
 
तू जगद्वंद्य जगदाधार । तू जगच्चालक जानकीवर ।
 
अजातशत्रु प्रियकर । हे आधोक्षजा तुच की ।।
 
 
हे पांडुंरंगे विठ्ठाबाई । अंत माझा मुळी न पाही
 
निज चरणी ठाव देई । ह्या अनाथ गणुकारणे ।।
 
 
जननी जनक त्राता पाता । तुच एक पंढरीनाथा ।
 
ॐकारुपा अनंता । पाय दावी मजलागी ।।
 
 
तुझे कराया पूजन । साहित्य आणु कुठुन ।
 
तूझ्या व्याप्ती वाचुन । वस्तु नुरली नारायण ।।
 
 
आता हे घननीळ । प्रेमाश्रु माझे.हेचि जल ।
 
तेणे तव पदे सोज्जवळ । प्रक्षालीन पांडुरंगा ।।
 
 
चंदन माझी येथे भक्ती । ती तुज लावितो रमापती ।
 
मन्मरुप सुमनाप्रती । मान्य करी रे गोविंदा ।।
 
 
मायेचा दावितो धूप । मोहरुप जाण दिप ।
 
क्रोधा कर्पुर साक्षेप । जाळुन तूज ओवाळितो ।
 
त्वन्नाम हे पक्वान्न । त्याचा दावितो नैवैद्य जाण ।
 
तो सेवोनी तुष्टमान । व्हावे तुवा पांडुरंगा ।।
 
 
प्रार्थनापूर्वक नमस्कार । तुज मी करतो वरचेवर ।
 
करी करुणेची पाखर । देवाधिदेवा मजवरी ।
 
माझी इच्छा पुरविणे । अशक्य नाही तुज कारणे ।
 
दारी मी घेतले धरणे । आता परते लोटु नको ।।
 
 
पापा ताप आणि दैन्य । माझे करा अवघे हरण ।
 
चिंतातुर माझे मन । न राहो देवा कदापि ।।
 
 
सदा असावी आनंदी वृत्ती । भजनी तुझ्या राहो प्रीती ।
 
क्लेश नुपजे कदा चित्ती । कवणाचाही पांडुरंगे ।।
 
 
नरदेहासी येवुनिया । जावो न तुझा दास वाया ।
 
धावण्याधाव पंढरीराया । निष्ठुर कदा होवु नको ।
 
जे जे माझे भाषण । ते ते देवा तुझे भजन ।
 
तैसे हिंडणे फिरणे जाण । प्रदक्षणा माया बापा ।।
 
 
मी हिन दीन अज्ञानी । परी संग्रहा ठेवी.चक्रपाणी ।
 
तुझ्या पदरी बांधलो जाणी । आता न बरे वाईट म्हणे ।।
 
 
माझे.काही अशुभ होता । तुझे नाव जाईल समर्था ।
 
पांडुरंगा रुक्मिणकांता । याचा विचार करावा ।।
 
 
लेकराची अवघी आळ । माता पुरवितो तत्काळ ।
 
तैसा तू हे घननीळ । कोड माझे पुरविते हो ।
 
सज्जानांचा उध्दार । केल्या न नवल साचार ।।
 
 
मजसारिखा पापागर । उध्दरिल्या होय कीर्ती
 
तू धरिले नामाभिधान । आपणसी पतितपावन ।
 
याचे करुनि स्मरण । उध्दार करा लवलाही ।।
 
 
देवा तुझे.करता स्मरण । नारदतुंबरे धरिले मौन ।
 
शेष ही भागला जाण । सहस्त्रमुखे असुन ।।।
 
 
ऐसा तू अनिर्वाचच्य अचिंतन । सर्वसाक्षी रुक्मिणीकांत।
 
सर्वाद्य सर्वाततीत । ॐ नमोजी विठ्ठला
 
हे सर्वश्वरा गुणाधामा । हे महामंगला पुर्ण कामा ।
 
संतजनांच्या विश्रामा । पांडुरंगा माझे आई ।।
 
 
या स्तोत्रास देई वर । की जो.पठण करील निरंतर ।।
 
त्याचे करावे.त्रिताप दुर । सगुणभेटी देऊनिया ।
 
स्तोत्र भावे वाचिता नित्य । बध्दही होतील मुक्त ।।
 
 
धनहीन श्रीमंत होतील । विठ्ठल कृपेने ।
 
निपुत्रिकासी संतान । होईल याचे.केल्या पठण
 
भावे करिता संरक्षण । भूतबाधा निमेल पै.।।
 
 
आरोग्य होईल रोगियासी । हे पांडुरंग स्तोत्र जपल्यास ।
 
अल्पायु जीवासी । शतायुत्व होईल
 
हे स्तोत्र.केवळ पंढरी । वर्ण्य विषय.हा श्रीहरी
 
उभा अक्षर विटेवर । पद्यरचना ही चंद्रभागा ।।
 
 
पारायण हीच वारी । करा अत्यादरे निर्धारी ।
 
भक्तिपताका स्कंधावरी । घेवुनिया भाविक हो ।
 
निश्चय हा पुंडलिक । भेटवीर वैकुंठ नायक ।
 
 
या अवघ्यासी हा भाक । समर्थ साईबांबांची ।.
 
साधारणानामा संवत्सरी । शके अठराशे.बत्तिसांतरी ।
 
श्रावणमासी.सोमवारी । वद्य पक्षाचे दशमीस ।
 
 
पूर्ण झाले हे.स्तोत्र । महक्षेत्र पंढरीत । ।
 
दामु नामेमदीय छात्र । लेखक यासी झाला ।।
 
स्वस्ति श्री पाडुंरंगस्तोत्र । भावे.वाचितो.भाविक भक्त ।।
 
 
त्यांचे अवघे.पुरोत.हेत । हे ची.इच्छी दासगणु ।
 
श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणामस्तु ।। शंभु भवतू ।।श्रीरस्तु ।।
 
 
पुंडलिकवरदा हरि विठ्ठल । सीताकांत स्मरण जयजयराम
 
नमःपार्वतीपते हरहरमहादेव ।। १११।।
 
।। श्रीकृर्ष्णापणमस्तु ।।
 
 
Pandurang Stotra,श्री पांडुरंग स्तोत्र
श्री पांडुरंग स्तोत्र

Leave a comment